स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

मराठी समाजशास्त्र परिषदचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन “लिंगभाव, शिक्षण आणि विकास” दिनांक १७ व १८ फेब्रुवारी, २०२५- माहितीपत्रक - नोंदणी फॉर्म


समाजशास्त्र विषयाच्या अध्ययनाची सुरवात २० व्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई विद्यापिठामध्ये होवून तद्नंतर संपूर्ण भारतभर विद्यापिठ व महाविद्यालयीन पातळीवर समाजशास्त्र विषय शिकविण्यात येवू लागला. महाराष्ट्रामध्ये सामाजिकशास्त्र विद्याशाखे अंतर्गत अत्यंत विद्यार्थीप्रिय विषय म्हणून समाजशास्त्राचा उल्लेख करता येतो.

महाराष्ट्रात पदवी व पदव्यूत्तर स्तरावरील शिक्षणासाठी मराठी माध्यमाचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या संदर्भून सकस अध्ययन सामूग्री पुरविण्याची गरज निर्माण झाली. ही गरज ओळखून तसेच समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थी यांचामध्ये विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर एक स्वतंत्र व्यासपिठाची गरज निर्माण झाली. यातूनच १९८१ मध्ये डॉ.एम.जी.कुलकर्णी यांनी विविध विद्यापिठातील समाजशास्त्राच्या अध्यापकांशी संपर्क साधून असे व्यासपिठ निर्माण करण्याविषयी विचार मांडला. यातूनच मराठी समाजशास्त्र परिषद आकाराला आली. मराठी समाजशास्त्र परिषदेला कायदेशीर दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार संस्था नोंदणी अधिनियम १८६० नुसार मराठी समाजशास्त्र परिषदेस नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले व दि. २७/६/१९८३ रोजी मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० प्रमाणे प्रमाणपत्र मिळाले.

मराठी समाजशास्त्र परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून एम.जी.कुलकर्णी परिषदेचे सचीव म्हणून डॉ.व्ही.व्ही.देशपांडे कोषाध्यक्ष म्हणून डॉ.सुधा काळदाते तर कार्यकारीणी सदस्य म्हणून डॉ.पू.ल.भांडारकर, डॉ.विलास संगवे, डॉ.वाय.बी.दामले, डॉ.धीरेंद्र नारायण, डॉ.वाळुंजकर, डॉ.शैलजा जोशी यांची निवड करण्यात आली.

विशेष महत्वाचे

मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशनाचा अहवाल


आमसभेची सूचना - २०२५

आमसभेची सूचना - २०२५- Click here



मराठी समाजशास्त्र परिषदचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन “लिंगभाव, शिक्षण आणि विकास” दिनांक १७ व १८ फेब्रुवारी, २०२५ - माहितीपत्रक

नोंदणी फॉर्म : https://forms.gle/VSBAC584C72u97W18



नोटीस - पुरस्कार प्रस्ताव -२०२४



नोटीस



नोटीस - पुरस्कार प्रस्ताव -२०२४



"लिंगभाव, शिक्षण आणि विकास" दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद" श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा आणि मराठी समाजशास्त्र परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने "लिंगभाव, शिक्षण आणि विकास" या विषयावर दिनांक १७ व १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी ३४ वे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी येथे आयोजित केले आहे. सदर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म लिंक भरून नोंदणी करावी. संशोधन पेपर पाठविण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२५ आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdZmezQcVb-_2xYLYvYaH4sSjAhCnwjSD1LA1TZWgiLxZFwJg/viewform?usp=sf_link

आमसभेची सूचना - २०२४



मराठी समाजशास्त्र परिषद पुरस्कार - २०२४



अध्यक्षांचे मनोगत

       मराठी समाजशास्त्र परिषद च्या सर्व प्राध्यापकांना सस्नेह नमस्कार, महाराष्ट्रातील समाजशास्त्राच्या प्राध्यपकांना एकत्र आणण्याचा उद्देशाने एप्रिल १९८३ मध्ये औरंगाबाद येथे मराठी समाजशास्त्र परिषदे ची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत विविध विद्यापीठातील नामांकित विचारवंतांनी या परिषदेचे अध्यक्ष पद भुषवून या परिषदेला व्यापक आणि निश्चित दिशा देण्याचं कार्य उत्तमरित्या केले आहे त्यांचे आपण खरेच ऋणी आहोत.

आजीवन सदस्य नोंदणी