स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

आमच्या बाबत...

मराठी समाजशास्त्र परिषदेच्या स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी परिषदेचे अधिवेशन घेवून या अधिवेशनात विविध विषयावर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा घडवून आणून समाजपयोगी विद्यार्थीभिमुख, संशोधनात्मक बाबीवर विचारमंथन घडून यावे असे ठरले. यादृष्टीने मराठी समाजशास्त्र परिषदेचे पहिले अधिवेशन परिषदेला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाल्यानंतर दि.२८ ते ३० जून १९८४ मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आले. परिषदेला कायदेशीर स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी दोन अधिवेशने घेण्यात आली होती. जी २७ व २८ जून १९८१ मध्ये हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे दुसरे अधिवेशन ८ ते १० जून १९८५ मध्ये पुणे विद्यापीठ पुणे. तिसरे अधिवेशन २६,२७ डिसेंबर १९८७ मध्ये मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत पैठण येथे व त्यानंतरची अधिवेशने अनुक्रमे यशवंत महाविद्यालय वर्धा येथे २३ व २४ सप्टेंबर १९८९, दि.१२ व १३ नोव्हेंबर १९९१ देवचंद महाविद्यालय अर्जुननगर कोल्हापूर. दि.१७ ते १९ नोव्हेंबर १९९४ ला सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपुर. दि. १८ व १९ नोव्हेंबर १९९५ ला बर्हिजी स्मारक महाविद्यालय,वसमत. १९१६ ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दि. ६ व ७ नोव्हेंबर १९९७ ला गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी. दि. २७ व २८ ऑक्टोंबर १९९८ ला तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर. दि. २१ व २२ नोव्हेंबर १९९९ ला महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर. दि. ३ व ४ नोव्हेंबर २००१ ला देवगिरी महाविद्यालय,औरंगाबाद. दि. २७ व २८ नोव्हेंबर २००३ ला बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय,जालना. दि. ५ व ६ फेब्रुवारी २००८ ला शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड जि.नांदेड व दि. २ व ३ फेब्रुवारी २००९ ला परिषदेचे १९ वे अधिवेशन देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे संपन्न झाले. २०१६ पर्यंत विविध अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा घडून आली.

मराठी समाजशास्त्र परिषदेचे काम केवळ अधिवेशने घेण्यापर्यंतच मर्यादित राहू नये म्हणून मराठी समाजशास्त्र परिषदेची एक संशोधन पत्रिका असावी या संशोधन पत्रिकेतून समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी लेखन करावे यासाठी डिसेंबर १९८७ मध्ये ‘समाजशास्त्र संशोधन पत्रिका’ या नावाने संशोधन पत्रिकेचा पहिला अंक औरंगाबादहून प्रकाशित करण्यात आला. १९९४ मध्ये परिषदेचा तिसरा अंक दलित समूह आणि दलित समस्या या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रकाशित करण्यात आला. १९९५ मध्ये समाजशास्त्र संशोधन पत्रिकेचा चौथा अंक प्रकाशित करण्यात आला. पाचवा अंक मार्च १९९६ मध्ये प्रबंध परिचय अंक म्हणून प्रकाशित करण्यात आला. समाजशास्त्र संशोधन पत्रिकेचा ६ वा अंक नागपूर येथून प्रकाशित करण्यात आला. यानंतर सलग रूपाने सातवा व आठवा अंक पुणे येथून प्रकशित करण्यात आला परंतु त्यानंतर बऱ्याचश्या खंडानंतर डिसेंबर २००७ मध्ये ९ वा अंक पुणे येथून प्रकाशित करण्यात आला. बॅ. बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेगुर्ला येथे आयोजित केलेल्या मराठी समाजशास्त्र परिषदेच्या २० व्या अधिवेशनात समाजशास्त्र संशोधन पत्रिकेचा दहावा अंक प्रकाशित होत आहे यापुढील काळात संशोधन पत्रिका सातत्यपूर्णरित्या प्रकाशित होण्याकडे परिषदेचा काल असणार आहे समाजशास्त्र संशोधन पत्रिकेचा प्रकाशित झालेल्या अंकातून जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त समाजशास्त्रजांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ज्यात डॉ.एम.जी.कुलकर्णी, डॉ.डी.एन.धनागरे, डॉ.उत्तम भोईटे, डॉ.सुधा काळदाते, डॉ.बी.एस.बावीस्कर, डॉ.य.भा.दामले, डॉ.गोविंद गारे, डॉ.प्रल्हाद जोगदंड, डॉ.प्रकाश बोबडे, डॉ.भास्कर भोळे, इत्यादींचा नामोल्लेख करता येवू शकेल.

१ जानेवारी १९९० पासून मराठी समाजशास्त्र परिषदेने मराठी भाषेतून लिहिलेल्या समाजशास्त्राच्या सर्वोत्कृष्ट संशोधनपर ग्रंथ व पाठ्यपुस्तकाला कै.जय जोशी परितोषिक देण्याचे निश्चित केले. त्यानुसार पहिले परितोषिक संशोधनपर ग्रंथासाठी डॉ.गोविंद गारे, यांच्या आदिवासी कला या ग्रंथाकरिता तर ग्रामीण जीवन संघटन या वि.वि.भिडे यांनी लिहिलेल्या पाठ्य पुस्तकासाठी देण्यात आले. या पुढील काळातही अशी पुरस्कार योजना परिषदेच्या वतीने चालू राहणार आहे.

मराठी समाजशास्त्र परिषदेच्या विले पार्ले, मुंबई येथील २६ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रा. डॉ. मंजुषा नळगिरकर यांच्या "ग्रामीण भागातील इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल आणि इंग्रजी शाळांची गुणवत्ता" या शोध निबंधास प्राध्यापकांसाठी असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ शोध निबंध पारितोषिक देण्यात आले. खास विध्यार्थ्यासाठी असणारे डॉ. जी. एस. घुर्ये उत्कृष्ठ शोध निबंध पारितोषिकासाठी एकमेव शोध निबंध सादर करण्यात आल्यामुळे या अधिवेशनामध्ये हो पुरस्कार देण्यात आलेला नाही. प्रा. डॉ. प्रशांत सोनावणे (जळगाव) यांच्या "कौटुंबिक रचनेत वृंधांची भूमिका - एक समाजशास्त्रीय अभ्यास" या पुस्तकासाठी कै. श्री. जय जोशी पुरस्कारासाठी निवड झाली.

मराठी समाजशास्त्र परिषदेची जोपासना करण्यासाठी व त्यामध्ये वृद्धी घडवून आणण्यासाठी मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या विविध मान्यवरांनी कार्य केले आहे. ज्यामध्ये डॉ.एम.जी.कुलकर्णी, सुधा काळदाते, डॉ.पू.ल.भांडारकर, डॉ.डी.एन.घनागरे, डॉ.उत्तम भोईटे, डॉ.एस.एन.पवार, डॉ.प्रकाश बोबडे, डॉ.आनंद अनभुले, डॉ.सुरेश वाघमारे, डॉ.किशोर राउत, डॉ.दिलीप खैरनार, डॉ. जगन कराडे , डॉ. स्मिता अवचार, डॉ.महेंद्रकुमार जाधव व डॉ. सरोज प्रदीप आगलावे.

सध्या मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल भगत कार्यरत आहेत.